Aamhi Cycle Premi Foundation

सायक्लोएज्यु 2024

ठाण्याच्या "आम्ही सायकलप्रेमी" प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक विद्यार्थीभिमुख उपक्रम हाती घेतले आहेत. गेल्या रविवारीच यापैकी विद्यार्थी गौरव व गरजू विद्यार्थ्यांना सायकल आणि शालेय सामुग्री वितरण समारंभास उपस्थित रहाण्याचा योग आला. एक अतिशय रेखीव आणि शिस्तबद्ध असा समारंभ होता. समारंभास विद्यार्थी व पालकांची उपस्थितीही उल्लेखनीय होती. केवळ सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून अतिशय योग्य अशा ठिकाणी ही मदत करण्याचे ठरवणे हीच मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे. त्यापुढे जाऊन आर्थिक प्रबंध करून त्याचे योग्य ठिकाणी वितरण करणे ही निश्चितच खडतर मेहनतीची आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची बाब आहे. हा उपकरम यशस्वी करण्यासाठी परचंड मेहनत घेतलेल्या पत्रकार प्रज्ञा म्हात्रे, दीपेश दळवी व प्रतिष्ठानचे सर्वच सभासद अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहेत. "आम्ही सायकलप्रेमी" च्या भावी उपक्रमांस मनःपूर्वक शुभेच्छा ..

-प्रमोद कुळकर्णी उपाध्यक्ष, ठाणे जिल्हा ॲथलेटिक संघ

आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केलेला 'सायक्लोएज्यु ', हा अविस्मरणीय उपक्रम गेल्या रविवारी म्हणजेच ०७ जुलै २०२४ रोजी संपन्न झाला. अविस्मरणीय म्हणण्याचे कारण म्हणजे, माझ्या लहानपणीच्या सायकल विषयीच्या आठवणी जाग्या झाल्या. दुसरे कारण म्हणजे ज्या म.ना. प.शाळेतील निवडक मुला मुलींना पुरस्कार रुपात सायकली अथवा शैक्षणिक साहित्य प्रदान केले गेले त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य. या दोन्ही गोष्टी मला मनापासून भावल्या. ही मुले, लाभार्थी अर्थाने लाचार नव्हती तर कर्तृत्ववान मुले होती. मला खात्री आहे की या बक्षिसाची आतवण त्यांना पुढील आयुष्यात आणखीन काही कर्तुत्व दाखव्यास प्रवृत्त करतील. आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे आणि तिच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

सुरेंद्र दिघे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

रणरगिणी सायकल राईड 2023

आज खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाला. २३० हून अधिक महिलांनी रणरागिणी सायकल राईडमध्ये सहभाग घेऊन ही राईड अविस्मरणीय केली. समानतेचा संदेश देणाऱ्या या राईडमध्ये तृतीयपंथी भगिनी सुधाताई यांनी देखील उपस्थिती लावली. चिमुकल्यांबरोबर सायकल राईड करण्याचा मोह पोलीस काकांनीही आवरला नाही. वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी देखील सायकल राईडमध्ये सहभाग नोंदविला. माय लेक - माय लेकी , मैत्रिणी, बहिणी, पिता पुत्र अशी सगळी नाती या राईडमध्ये पाहायला मिळाली. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्टय ठरले ते ठाणें ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली धाटे घाडगे आणि जिल्हा विधी प्राधिकरण सेवाचे सचिव श्री. ईश्वर सूर्यवंशी यांची उपस्थिती. डॉ. दिपाली धाटे घाडगे यांना संस्थेच्यावतीने रणरागिणी पुरस्कार तर महिलांना सायकल शिकविणाऱ्या मीनाक्षी गायकवाड यांना विशेष सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट वेशभूषा साकारणाऱ्या ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिचारिका सुप्रिया पुरी यांनी या स्पर्धेत बाजी मारली. या कार्यक्रमासाठी आमच्या पाठीशी उभे राहणारे आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, संदीप माळवी, उपायुक्त वर्षा दीक्षित, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांचे मनःपूर्वक आभार. स्वतःचे वैयक्तिक प्रॉब्लेम बाजूला ठेवून माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझ्या कोअर कमिटीचे सगळे पदाधिकारी दीपेश दळवी, धनश्री गवळी, विनोद फर्डे, वरुण भामरे, सिद्धार्थ जोशी, अभिजीत रसाळ, निखिल गावडे, पंकज कुंभार, मनोज सपकाळ, शेखर खताळ, अजय नाईक, एकनाथ पवळे, माधुरी कोळी, गणेश कोळी, संकेत सोमणे, अजय भोसले, कपिल मांढरे, प्रणव, संदिप कुलकर्णी, भुसारा सर, गजानन दांगट काका आणि माझे मनोधैर्य वाढवणारे आमचे बारसे सर, आपणा सर्वांचे मी शतशः ऋणी आहे .

प्रज्ञा म्हात्रे संस्थापिका-अध्यक्षा आम्ही cycle प्रेमी फाउंडेशन

सायकल प्रेमी संस्थेच्या सर्व सदस्य व संस्थापिका प्रज्ञा म्हात्रे यांचे खूप खूप अभिनंदन जागतिक महिला दिन निमित्त आपण अतिशय सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केले. हा कार्यक्रम चिरकाल स्मरणात राहील. केवळ सायकलींग राईड न ठेवता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देणे , सामाजिक मुद्दा घेऊन त्याचा प्रसार व प्रचार करून त्याबाबत जनजागृती करणे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून तो आपणा सर्वांचे तर्फे प्रभावीपणे मांडण्यात आलेला आहे. खरंच आपला उपक्रम हा कौतुकास्पद आहे. पुनश्च एकदा प्रज्ञा मात्रे व सायकल प्रेमी संघटनेच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

ईश्वर सूर्यवंशी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव

महिला दिनानिमित्त विशेष सायकल रायडींग रॅली आयोजित केली व हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल अध्यक्ष्या प्रज्ञा मात्रे मॅडम व आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन संस्थेचे सभासद यांचे सुद्धा विशेष अभिनंदन तसेच मोठ्या प्रमाणात अनेक स्पर्धकांनी भाग घेतला त्यांचेही अभिनंदन , संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

डॉ. नेताजी मुळीक

सायकल प्रेमी संस्थेच्या सर्व सदस्य व संस्थापिका प्रज्ञा म्हात्रे यांचे खूप खूप अभिनंदन जागतिक महिला दिन निमित्त आपण अतिशय सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केले. हा कार्यक्रम चिरकाल स्मरणात राहील. केवळ सायकलींग राईड न ठेवता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देणे , सामाजिक मुद्दा घेऊन त्याचा प्रसार व प्रचार करून त्याबाबत जनजागृती करणे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून तो आपणा सर्वांचे तर्फे प्रभावीपणे मांडण्यात आलेला आहे. खरंच आपला उपक्रम हा कौतुकास्पद आहे. पुनश्च एकदा प्रज्ञा मात्रे व सायकल प्रेमी संघटनेच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

ईश्वर सूर्यवंशी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव

महिला दिनानिमित्त विशेष सायकल रायडींग रॅली आयोजित केली व हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल अध्यक्ष्या प्रज्ञा मात्रे मॅडम व आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन संस्थेचे सभासद यांचे सुद्धा विशेष अभिनंदन तसेच मोठ्या प्रमाणात अनेक स्पर्धकांनी भाग घेतला त्यांचेही अभिनंदन , संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

डॉ. नेताजी मुळीक

सर्वप्रथम खूप खूप आभार
आम्ही cycle प्रेमी संस्थेला जेव्हा पासून भेटले त्यांच्या सोबत काम केलं तेव्हाच मनात ठरवलं,बहुदा मनाला वाटलं की इथे आपलं जमू शकेल....या संस्थेचा प्रत्येक सदस्यचे काम करण्याची पद्धत समोरच्याला सोबत कंफर्टेबल वाटेल अशी आहे.त्यामुळे तेव्हा पासून ठरवलं संस्थेचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आणि स्वतःला जमेल तस काम करायचं. आजच्या कार्यक्रमासाठी fancy dress मध्ये आल तर चालेल असं नमूद केलं होतं.मग या संस्थेची सदस्य म्हणून बाकी कामात वेळ देणं शक्य नाही तर काहीतरी करावं म्हणून आजचा हा सगळा खटाटोप.......आणि आपल्या सगळ्यांना तो आवडला आपण भरभरून कौतुक केलं आणि सन्मानित केलं... आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार

सुप्रिया पुरी परिचारिका, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय

आपण सर्वांनी उत्तम नियोजन केले. आम्हा हिरकणीना सायकल चालवण्याची संधी दिल्यामुळे सायकलिंगचा आनंद घेता आला. आयोजकांचे आभार.

मनिषा सुर्वे सचिव, हिरकणी प्रतिष्ठान, डोंबिवली

A Ride for the Transgenders

आम्ही cycle प्रेमी फाउंडेशनने आयोजित केलेला 'एक राईड तृतीयपंथीनसाठी - त्यांच्या सन्मानासाठी'हा उपक्रम अतिशय चांगला होता. तृतीयपंथीनसाठी फारसे कोणी पुढे येत नसताना आम्ही cycle प्रेमी फौंडेशनने या वेगळ्या विषयावर सायकल राईड आयोजित करून समाजप्रबोधन केले. अतिशय नियोजनबद्द या कार्यक्रमाला पोलिसांचे नेहमीच सहकार्य राहील.

विनोद लभडे पोलीस उपनिरीक्षक, नौपाडा पोलीस स्टेशन

It was amazing experience with Cycle Preme Foundation. This was my first experience. Theme selected attracted me, which was for social awareness. I felt proud to be a part of it. Will be happy n always be interested for next activity. Never felt as a new comer in this group.

शीला बनसोडे

एक खरोखरच कौस्तुकास्पद वैचारीकता... सायकलींग हा केवळ छंद म्हणून न जोपासता आपणही समाजाचे तरी देणं आहोत आहोत या सामाजीक परि-भावनेने संपन्न झालेला उल्लेखनिय कार्यक्रम... मुंबई - ठाणे सारख्या धकाधकीच्या फास्ट लाईफ मध्ये दैनदिनी मध्ये इतरत्र कोठे बघायला वेळही नसतो. अशाच वेळी आम्ही सायकल प्रेमी टिमने आपल्या सभोवताली असलेल्या वंचीत घटकाला अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी दृढ संकल्प करत सर्वप्रथम पुढाकार घेतला हा आम्हां ठाणेकरांचा बहुमानच... सदर कार्यक्रम प्रमुख अतिथींच्या उपस्थित स्टार्ट टू एन्ड नियोजन बद्धता, वेळेची शिस्तबद्दता पाळत सर्वांनी उत्स्फूर्दपणे सहकार्य करत कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आम्ही सायकल प्रेमी संपूर्ण टिमचे हार्दिक आभार. तसेच ह्या उल्लेखनिय कार्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...

श्री. प्रवीण चिवटे (ठाणे पूर्व)

खूपच चांगलं आयोजन होत सर्व टिम खूप भारी आहे अशीच सात सर्वांची राहील तर आम्ही सायकल प्रेमी फौंडेशन हा ग्रुप एका वेगळ्याच उंचीवर जाईल ठाण्यातील एक मेव ग्रुप असेल त्याचे चर्चा पूर्ण भारतात होईल आणि खास करून मी प्रज्ञा म्हात्रे चे आभार मानीन त्यांनी सई ला बोलवून त्या ग्रुप मध्ये राईड करायला सांगितलं.

आशिष पाटील

रणरगिणी सायकल राईड 2022

मुंबईच्या पहिल्या तृतियपंथी टॅक्सीचालक करीनाताई यांनी रणरागिणी cycle राईडबद्दल व्यक्त केलेल्या भावना
रणरागिनी सायकल राईड आयोजित केल्याबद्दल मी करीना आडे आम्ही cycle प्रेमी या ग्रुपचे मनःपूर्वक अभिनंदन करते. मी खूप खूप धन्यवाद देते आई जगदंबा चरणी प्रार्थना करते की तुमच्या ग्रुपला खूप यश येऊ दे. मी एक तृतीयपंथी करीना, मी लहानपणी सायकल चालवली असेल. त्यानंतर आज वयाच्या ४६ च्या वर्षी डायरेक्ट सायकल चालवली आणि तेही एका महिलेच्या पुढाकाराने. ती महिला म्हणजे माझी तुमची आमची प्रज्ञाताई म्हात्रे. मी ताईंची पोस्ट पाहिली आणि त्यांना म्हणाली मला देखील यात भाग घ्यायचा. त्यावर ताई म्हणाल्या की, का नाही, तुम्ही बिनधास्त होऊ शकता. आमच्या आणि तुमच्यात मी काही अंतर समजत नाही. तुम्ही माझ्या बहीण आहात. मग मला खूप बरं वाटलं. प्रज्ञा ताईंसारख्या जर ताई मिळत राहिल्या तर कदाचितच आम्हाला कधीही वाटणार नाही की आम्ही एक तृतीयपंथी आहोत, हिजडा समाज आहोत. ताईंनी कोणताही आचार विचार न करता मला सहभागी होण्यास सांगितले आणि वरून हे पण म्हणाल्या की, करीना ताई तुम्ही आलात तर आम्हाला खूप बरे वाटेल. तुम्ही जर सहभागी झालात तर नक्कीच आपण काहीतरी बदल आणू शकतो जो तुमचा आणि माझं स्वप्न आहे कि मी आज तृतीयपंथीबद्दल लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. किती बरं वाटतं आता किती मोठा विचार आहे, किती मोठा मन आहे तृतियपंथीबद्दल. त्यांचं स्वप्न आहे तर मी या प्रज्ञा ताईला सांगते की, संपूर्ण माझ्या किन्नर कमिटीकडून त्यांना मी भरभराटीचे शुभ आशीर्वाद देऊ इच्छिते. आई जगदंबे चरणी प्रार्थना करते, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आठ मार्च महिलादिनी माझ्याकडून माझ्या आईंना बहिणीना आशीर्वाद, महिला दिवसाचा खूप खूप धन्यवाद 🙏

करीना आडे, तृतीयपंथी

"खूपच छान आहे अनुभव, खूप मजा आली!"

रुपाली

"खुप छान अनुभव! आभारी आहे!"

गौरी कुलकर्णी

"छान अनुभव! खूप खूप आभार"

अद्विती देशमुख

"मस्त वाटले! खूप छान"

Sujata Ail

"खूप छान इव्हेंट होता!"

सोनाली

"खूपच छान!"

साक्षी भोसले

"It was a nice experience... thanks to the team!"

Rashmi

"अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम होता. सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन!"

तृप्ती काकडे

"खूप छान अनुभव आणि सुंदर आयोजन होते!"

स्वाती लाळगे

"Beautiful experience! Very nice arrangements! Supportive members! Hoping more like this events in future"

Madhuri

"खूप छान अनुभव होता... आता असं वाटतं १० किमी पण आरामात केलं असतं... असे इव्हेंट अधून मधून organize करत जा!"

प्रिया पंडित

"खूप छान अनुभव आणि उत्तम व्यवस्थापन ह्यामुळे riding करताना stress-free होतो. आलेल्या पाहुण्यांनी केलेले मार्गदर्शन पण informative होते. सर्व स्त्रियांना प्रोत्साहन देणाऱ्या पुरुषांचे विशेष कौतुक!"

प्रांजली मेहेंदळे-नामजोशी

"शालेय जीवनातील cycle चालवण्याचां आनंद २० वर्षानंतर अनुभवता आला, खुप छान अयोजन, मज्जा आली, वरचेवर असे उपक्रम राबिण्यात यावे ही विनंती. आयोजकांचे मनःपूर्वक आभार! धन्यवाद!"

सौ. दिपाली मारुती साबणे

"प्रज्ञा मॅडम, तुम्ही आम्ही सायकल प्रेमी गृप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रणरागिणी सायकल राईड मध्ये तुम्ही आम्हा सर्व महिलांना संधी दिल्याबद्दल तुमचे मनापासुन आभार. जवजवळ वीस-पंचवीस वर्षाने सायकल आज चालवली."

सौ. नम्रता पाटील

"खूप छान वाटले स्पर्धा पेक्षा सायकल रॅली खूप छान वाटले. सर्व आयोजकांचे आभार!"

सुवर्णा किशोर चव्हाण

"Congratulations to all ladies who participated in ' this cycle marathon. I feel so happy that I used this opportunity. The program was so well organised. Happy women's day to all ladies in advance!"

Jayashree Nawghare

"स्त्री ही बंदिनी' आज हे अगदी खोटे ठरले. "आम्ही सायकल प्रेमी" ग्रुपमध्ये सहभागी होताना स्फूर्ती आली. नियोजन मस्त केले होते. आपण असेच छान उपक्रम कराल आणि आम्ही त्यात सहभागी होऊ अशी ग्वाही !"

कु. प्राजक्ता प्रभाकर शेंबेकर

"खूप छान अनुभव आयोजन पण खूप मस्त होते. परंतु काही सुचवू इच्छिते. सहभागी महिलांना, मुलांना एखादी टोपी अथवा अन्य काही देता आले असते तर बरे झाले असते. म्हणजे सहभागी सहज ओळखता आले असते. आणि निदर्शकांसाठी फायदेशीर झाले असते."

सरिता पटवर्धन

"आपल्या ठाणे शहरात 'आम्ही सायकल प्रेमी' असा ग्रुप बनवल्याबद्दल प्रज्ञा म्हात्रे आणि त्यांचे सहकारी यांना धन्यवाद! महिला दिनाचे औचित्य साधून आम्हाला सायकल राईड करण्याची संधी दिली. मी २० वर्षांनी ह्या निमित्ताने ५ किमी राईड पुर्ण केली! वयाच्या ५२ व्या वर्षी नवा आत्मविश्वास निर्माण झाला. सर्व आयोजक व नगरसेविका सौ. रुचिता राजेश मोरे यांना धन्यवाद! सर्व सहभागी सायकल प्रेमींचे अभिनंदन!"

भाग्यश्री गिरी

"खूप खूप आभार Pradnya Mhatre अणि त्यांचे सहकारी...आज महिला दिनाचे निमित्त साधून हा सायकल rides चा अनोखा प्रोग्राम घेऊन आलात....आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री स्वतःला विसरत चाललीय, घर आणि परिवार यांच्या साठी धडपडत अणि स्वतःला विसरून जाते...पण आज अशा अनोख्या सायकल rideच्या निमित्याने मुलांची, भावाची, शेजाऱ्यांची सायकल घेऊन आई, बहीण आणि मैत्रीण बाहेर आली .. दिलखुलास सायकल वर स्वार झाली.... थँक्स वन्स अगेन्स..... रणरागिणी Ride"

दिप्ती पाटील

"आजचा सायकल राईड हा कार्यक्रम खूप छान आणि अतिशय शिस्तबद्ध झाला. आम्ही सगळ्यांनीच या कार्यक्रमाचा खुप आनंद घेतला. अनेकदा आम्ही बाईक रॅली मध्ये सहभाग कैला आणि आज एका अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्याचा अनुभव आम्हाला तुमच्यामुळे मिळाला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आज प्रत्येक महिला आपल्या वयाचा विचार न करता बिनधास्त सायकल घेऊन दिलखुलासपणे रस्त्यावर उतरली ते फक्त तुमच्यामुळे. बाकी मेडल आणि प्रमाणपत्रासाठी धन्यवाद ते घेऊन काही न करता खूप काही जिंकल्याचा आनंद मिळाला रणरागिनी... आम्ही सायकल प्रेमी"

पल्लवी पडवळ

"Congratulations to all ladies who participated in ' this cycle marathon. I feel so happy that I used this opportunity. The program was so well organised. Happy women's day to all ladies in advance!"

Jayashree Nawghare

"माझ्या आयुष्यातील खुप सुंदर अनुभव घडला आज. आज सकाळपासून मी सायकल चालवू शकेन की नाही याचा विचार करत होते पण कचराळी तलाव ला पोहोचले आणि स्फुरण संचारल्या प्रमाणे ५ किमी सायकल चालवली अजूनही माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही आहे. धन्यवाद 'आम्ही सायकल प्रेमी ग्रुप, प्रज्ञा म्हात्रे आणि रोहन पाठारे ज्याने मला पटवून दिले की मी हे करू शकेन!"

सुजाता पाठारे

"खूप छान अनुभव प्रथमत: संपूर्ण सायकल प्रेमी यांचे आभार. यात माझे सहकारी मित्र साबणे सर पवळे सर यांच्या सहकार्याने आज ३४ वर्षानंतर वयाच्या ५० व्या वर्षात राईड ठिकाणी सायकल हातात घेऊन आत्मविश्वासाने ती राईड पूर्ण केली. खूप छान अनुभव!"

विशाखा आर्डेकर